ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफायेबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू; पण आज हाती आलेल्या क्षणांचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या या क्षणांची मजा हीच, की ते दुसऱ्याला दिलं तर त्या जीवनाचं सोनं, नाही तर शुद्ध माती!

Saturday, October 22, 2022

।। श्रावण ।।

                                 ।। श्रावण ।। 

चिंबं श्रावणात होतो

खेळ उनपावसाचा 

दरवळे गंध मातीचा 

पाहावया इंद्रधनू साचा ।।

ओल्या मातीच्या कुशीत 

हुरळे रंग मनाचा 

नटलेल्या अवनी वरती 

शिरपेच हा इंद्रधुनुचा ।।

ओढ प्रत्यंचा इंद्रधनूची 

हो धनु भावनेचा 

उधळून दे आसमंती 

कल्पना शब्दरंगांच्या ।।

धाव मनाच्या मागे 

घे ठाव भावनेचा 

साकाराया इंद्रधनू 

डोळ्यातून मनाच्या ।।

 ।। तू समोर असल्यानं 

मला अस्तित्वाची जाण होते 

नसल्याचा फक्त भास सये 

माझं मी पण नाहीसं होतं ।।

।। तुझं ।।

                                             ।। तुझं  ।। 

तुझं हसणं सये 

पारिजातकाचा सडा 

तुझं बोलणं लकबी 

वाटे स्वरांचा हा विडा ।। 

तुझ्या पापण्यांची ताकद 

घेती नक्षत्र कवेत 

तुझ्या नजरेची भाषा 

घेई हृदयाचा वेध ।।

तुझी गुंफ़लेली वेणी 

वाटे वीज आकाशात 

सोडी मोकळे जेव्हा 

जसा पहिला पाऊस ।। 

तुझं चालणं सये 

आहे वळणांचा घाट 

तुझ्या पावलांचे ठसे 

एकसुर घंटानाद ।। 

।।आस।।

                                                ।।आस।। 

जशी किड्यालाही आहे 

फक्त ज्योतीचीच आसं 

माझी प्रेमाची झेपं 

जगतो आयुष्य क्षणातं ।।

रातराणीलाही आहे 

फक्त चंद्रासाठी जागं 

आता अहर्निश सये 

संगे स्वप्नांचीच कासं ।।

दूर काळोख्या अंधारी 

वाटे काजवा प्रकाश 

जरी शोधात फिरतो 

मी मला जागोजाग ।।

आहे जरी आभास 

दूर झुकले आकाश 

वेड्या मनालाही आहे 

तुझ्या प्रेमाचीच आस ।।

Tuesday, December 1, 2020

बस यू ही

 
दर्द यहाँ भी है वहा भी,फर्क सिर्फ इतना है,

वहा, नासूर ही सही, पर जख्म दिखता तो है,

यहाँ आषिकोंका जनाजा जा रहा है,

और पूछते है, घाव कहा है !!!

आग यहाँ भी है वह भी, फर्क सिर्फ इतना है,

वहाँ धुआं ही सही, पर आग दिखती तो है,

यहाँ दिलजले कि राँख हुई है,

और पुंछते है कौन जला है !!!