ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफायेबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू; पण आज हाती आलेल्या क्षणांचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या या क्षणांची मजा हीच, की ते दुसऱ्याला दिलं तर त्या जीवनाचं सोनं, नाही तर शुद्ध माती!

Friday, August 19, 2011

|| आभास ||


ही रात्र अंधारलेली, हा मंद धुंद वारा |

रोमांच तनी उठे,शोधे तुझा आसरा ||


येशील अवचित तू, आसमंत प्रफुल्लित सारा |

मंद चांदण्या रात्रि, उबदार तुजा निवारा ||


मी निवांत तुझ्यासवे,माझा न मी उरणारा |

चंद्र असे साक्षी, गंध तुझा मोहवणारा ||


दचकून जाग येई, आभास हा भासणारा |

मन सैरभैर होई, क्षणभंगुर हर्ष सारा ||

अभिकुल

Tuesday, August 2, 2011

|| आठवण तुझी ||

|| आठवण तुझी ||

ती आली कि माझा मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो ||



मला कळतंय मी तिच्या स्वाधीन होतोय, पण नाईलाज माझा हे तिलाही कळतंय,

कधी दूर दूर, कधी स्वगतच, कधी भूतकाळ, कधी भविष्यात, मी वर्तमान विसरतो

ती आली कि माझा मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो ||



मग मीही रमतो ,ती नेयील तिकडे फिरतो,ती असते माझ्या सवे, आसवे डोळ्यात हेरतो

ती आहेसच अशी, तू नसत्तंना येणारी, क्ष्यनार्धात माझं सर्वस्व स्वाधीन करतो

ती आली कि माझा मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो ||



ती येते क्षणासाठी, चटका मनाला लागतो,माझेच उणेदुणे, आणि मलाच मी सांगतो

चाहूल कोणाची, आणि ती पसार होते,गर्दीद एकांत शोधून, मग मीही थोडा झुरतो

ती आली कि माझा मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो || .... मी फक्त शरीर उरतो ||



अभिजीत कुळकर्णी