|| आठवण तुझी ||
ती आली कि माझा न मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो ||
मला कळतंय मी तिच्या स्वाधीन होतोय, पण नाईलाज माझा हे तिलाही कळतंय,
कधी दूर दूर, कधी स्वगतच, कधी भूतकाळ, कधी भविष्यात, मी वर्तमान विसरतो
ती आली कि माझा न मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो ||
मग मीही रमतो ,ती नेयील तिकडे फिरतो,ती असते माझ्या सवे, आसवे डोळ्यात हेरतो
ती आहेसच अशी, तू नसत्तंना येणारी, क्ष्यनार्धात माझं सर्वस्व स्वाधीन करतो
ती आली कि माझा न मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो ||
ती येते क्षणासाठी, चटका मनाला लागतो,माझेच उणेदुणे, आणि मलाच मी सांगतो
चाहूल कोणाची, आणि ती पसार होते,गर्दीद एकांत शोधून, मग मीही थोडा झुरतो
ती आली कि माझा न मी उरतो, ती असते आत्मा, मी फक्त शरीर उरतो || .... मी फक्त शरीर उरतो ||
अभिजीत कुळकर्णी