ज्या दिवशी जन्माला येणं जस्टिफायेबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू; पण आज हाती आलेल्या क्षणांचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या या क्षणांची मजा हीच, की ते दुसऱ्याला दिलं तर त्या जीवनाचं सोनं, नाही तर शुद्ध माती!

Tuesday, March 31, 2015

गर्दीलता एकांत बरा, कि एकांतातली गर्दी



अनोळख्या गर्दीतही, थोडा निवांतपणा असतो
एकांतात आठवण, जीव वेडापिसा फिरतो  ।।

गर्दी तेव्हडी बरी, हाकेला ओ तरी येतो
एकांताचं  म्हणाल तर, आवाज मात्र घुमतो ।।

असेल गर्दी तरी, तिलाही नियम असतात
सगळे नसले तरी, थोडे पाळायचे असतात ।।

आचार नसले तरी, विचार अनिर्बंध असतात
पाळायचे म्हंटले तरी, एकांताला नियम कुठे असतात ।।        

अभिकुल

।। आता सवायिचं झालय ।।


आता सवायिचं झालय ..
तुझं  दिसणं, गर्दीतही भासणं
माझं हसणं, वसंतात बरसण
आता सवायिचं झालय ..

आता सवायिचं झालय ..
तुझं नसणं, नको तेव्हा स्मरणं
नजर चुकवून आपली, ओल्या कडा पुसणं
आता सवायिचं झालय ..

आता सवायिचं झालय ..
तुझा आवाज, ओळखीचा भास
काळजाचा ठाव, मनाला आस
आता सवायिचं झालय ..

आता सवायिचं झालय ..
आठवांची मर्जी, आठवांचीच सरशी
पाणवलेल्या डोळ्यांमागे आसवांची गर्दी
आता सवायिचं झालय ..

अभिकुल